March 23, 2026


वाळूजमहानगर, (ता.9) – रांजणगाव (शेणपुंजी) ग्रामपंचायतीच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्त्या, शिक्षिका, कर्मचारी महिला आदी विविध क्षेत्रातील कर्तुत्वाना महिलांचा शुक्रवारी (ता.7) रोजी सन्मान करण्यात आला.

कर्तुत्वास चालना मिळावी, पाठीवर कौतुकाची थाप पडावी. करत असलेल्या कामास प्रोत्साहन मिळावे. या अनुषंगाने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ग्रामपंचायत कार्यालय रांजणगाव (शे,पु) येथे महिलांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजित करण्यात आले होते. यामध्ये आपले कार्य बजावत असलेल्या अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्त्या, शिक्षिका, कर्मचारी महिला आदींचा समावेश आहे. या महिलांना पुष्पगुच्छ, सन्मानपत्र आणि भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सत्कारमूर्ती महिलांनी मनोगत व्यक्त करून सत्काराला उत्तर दिले.

यावेळी सरपंच योगिता प्रभाकर महालकर, अंगणवाडी पर्यवेक्षिका प्रतिभा परदेशी, ग्रामविकास अधिकारी गणेश धनवई, माजी पंचायत समिती सदस्य दीपक बडे, माजी सरपंच मोहनीराज धनवटे, ग्रामपंचायत सदस्य भीमराव कीर्तीकर, पंकज हिवाळे, नंदिनी लोहकरे, साईनाथ जाधव, कविता हिवाळे, सायराबानो सय्यद, कांता जाधव, अशोक जाधव, संजीवनी सदावर्ते, आश्विनी हिवाळे, सत्यशिला सुरुंग, संदीप मनोहरे, नंदाबाई बडे, निर्मला पठाडे आदींची उपस्थिती होती.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *