वाळूजमहानगर (ता.16) :- रांजणगाव (शेणपुंजी) येथील बसवंतराव पाटील प्राथमिक व माध्यमिक इंग्रजी शाळेत पंडीत जवाहरलाल नेहरू यांचा वाढदिवस म्हणजेच (चिल्ड्रन्स डे ) बाल दिवस कार्यक्रम सोमवारी (ता.14) रोजी विविध उपक्रम राबविण्यात येऊन उत्साहात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी विद्यार्थ्यांनी क्राफ्ट संबंधित जवाहरलाल नेहरू यांना आवडणारी टोपी व गुलाबाचे फुल कागदापासून बनवले होते. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते सादर केली. काही विद्यार्थ्यांनी भारत देशाचा नकाशा स्वतः उभे राहून तयार केला होता. याप्रसंगी नामदेव खराडे यांच्या मार्फत खाऊ वाटप करण्यात आला. आणि विद्यार्थ्यांच्या अनेक उपक्रमाबद्दल त्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी कृष्णा कोटिंग कंपनीच्या कांताबाई जाधव, नीता साबळे, संगीता राऊत, नमिता गायकवाड, संस्थेचे अध्यक्ष आय जी जाधव, गजानन विद्या मंदिरच्या मुख्याध्यापिका बस्वदे मॅडम, सचिव हरीश जाधव तसेच प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका बिदरकर मॅडम, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक शिरसाठ यांच्यासह शाळेतील शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनिया झिंझोट यांनी केले. तर शिरसाठ यांनी आभार मानले.