
वाळूजमहानगर, (ता.14) – आमदार सतीश चव्हाण यांच्या प्रयत्नातून राजणगाव येथे महावितरण उपविभाग केंद्र मंजूर झाल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्यावतीने फटाके फोडून जल्लोष करकरण्यात आला.

रांजणगाव (शेणपुंजी) येथील इतक्या रस्त्यावर झालेल्या या जल्लोष प्रसंगी तालुकाध्यक्ष अंकुशराव काळवणे, माजी उपसरपंच भरत पाटील गरड, शिवसेना उपतालुकाप्रमुख विजय तोगे, सुरेश बोराडे, मनोहर गवळी, संजय मंजुळे कृष्णा लोहकरे, अक्षय ढोले, अनिश शेख, माऊली नवघरे, सुरेश बोकन, संजय पाठे, प्रकाश टेकाळे, भाऊसाहेब वेताळ, मगरे मिस्तरी, कृष्णा कानडे, बबनराव भाग्यवंत, गणेश गवळी यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
