वाळूजमहानगर, ता.14- रांजणगाव (शेणपुंजी) येथील श्री गजानन प्राथमिक व माध्यमिक विद्यामंदिर, श्री गजानन ज्युनिअर कॉलेज व बसवंतराव पाटील इंग्लिश स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेत राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती 12 जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
याप्रसंगी शाळेपासून काढण्यात आलेल्या
भव्य रॅलीत विद्यार्थिनींचा राजमाता जिजाऊंच्या वेशभूषेत घोड्यावर स्वार झालेल्या राजमाता जिजाऊ यांचा जिवंत देखावा व राजमाता जिजाऊ यांच्या वेशभूषेत अनेक विद्यार्थिनी, महिला पालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.या रॅलीमध्ये झांज पथक, लेझीम पथक, ढोल पथक, विशेष म्हणजे मुलींच्या रक्षणासाठी काठी प्रात्यक्षिके सादर करण्यात आले. रॅली दरम्यान रांजणगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. त्याचबरोबर विशेष उपक्रम म्हणजे विद्यार्थ्यांनी राजमाता जिजाऊ यांचे विचार ग्रीटिंग कार्डद्वारे रॅलीतुन नागरिकांना वाटप करून जनजागृती केली. या रॅलीच्या सांगते नंतर शाळेतील कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली. दीपप्रज्वलन आणि प्रतिमा पूजा संस्थेचे अध्यक्ष आय. जी. जाधव, सचिव हारीश जाधव, प्रमुख अतिथी सुरेश म्हस्के, प्राथमिकच्या मुख्याध्यापिका सुरेखा बस्वदे, उपमुख्याध्यापक शहाजी मंगनाळे, माध्यमिकचे मुख्याध्यापक हनुमंत जाधव, प्राथमिक विभाग प्रमुख मनीषा नवथर, हनुमंत जाधव, इंग्रजी विभाग मुख्यध्यापक भाऊसाहेब शिरसाट, रेखा बिदरकर व पालक प्रतिनिधी यांच्या हस्ते करण्यात आले.
तसेच शाळेतील विद्यार्थ्यांनी राजमाता जिजाऊ यांच्या जीवनावर आधारित नाटिका सादरीकरण केले. प्रगती लीपने, पवार आरती, ओजस्वी लोहार, परिणीती देशमुख, भूमी वैद्य, आर्या कदम,अनुजा देवरे आदींनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या विषयी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लता वैष्णव तसेच आभार गुलाब मोहिते यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कल्याण कुलकर्णी, अशोक तारडे, संदीप हिंगणकर, परमेश्वर गीते, विशाल जाधव, सौरभ लगड, सुनील शिंदे, उल्हास वाघ, उज्वला सवई, गंगासागर बोराडे, संजीवनी चिकाळे, अनुराधा मुळे, स्वाती सूर्यवंशी, छाया वाघदरे, दिलीप ढोले, साजिद शेख, स्वाती पाटील, डिंपल टोके, तृप्ती लकडे, हर्षदा भोबे, सुरेखा शिंदे, अस्मिता तायडे, मयुरी मराठे, मयुरी चव्हाण, सोनी कुमारी, क्रांती पवार, पूजा मौर्य, प्रीती नरवाडे, पूजा गिरी, माहेश्वरी भातेवले, प्रल्हाद मंगनाळे आदींनी परिश्रम घेतले.