वाळूज महानगर – श्री गजानन प्राथमिक विद्यामंदिर रांजणगाव (शे.पु) शाळेत मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रम प्रसंगी ध्वजपूजन संस्थेचे सचिव हरीश जाधव यांच्या हस्ते तर संस्थापक अध्यक्ष आय जी जाधव यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले.
कार्यक्रम प्रसंगी प्राथमिक विभाग मुख्याध्यापिका सुरेखा बस्वदे, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक मसनाजी शिनगारे, बसवंतराव पाटील इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका बिदरकर मॅडम यांची उपस्थिती होती. यावेळी मयुरी शेजवळ, संजीवनी सवाई, सृष्टी मुटकुळे, समृद्धी बिडवे, नंदनी बंगाळे आदी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच यावेळी चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धाचेही आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मीरा देशपांडे यांनी तर आभार एम व्ही शिनगारे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी एस एम हिंगणकर, प्रा संजय तुपे, बी व्ही शिरसाट, एच बी जाधव, के कुलकर्णी, एन एस रेलेकर, जब्बार पठाण आदींनी शिक्षकांनी परिश्रम घेतले.