
वाळुज महानगर – भारतीय जनता पार्टीच्या बिहार विजयानिमित्त वाळूज परीसरातील रांजणगाव (शेणपुंजी) येथे उत्तर भारतीय मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष संजय पांडे, सरचिटणीस प्रद्युम्न शुक्ला यांच्या सूचनेनुसार आणि भाजप जिल्हाध्यक्ष संजय खंबायते यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप उत्तर भारतीय मोर्चाच्या वतीने शुक्रवारी 14 नोव्हेंबर रोजी जल्लोष करण्यात आला.
यावेळी गुलाल उधळून फटाक्याची आतषबाजी करण्यात आली. तसेच लाडू आणि मिठाई वाटप करण्यात आली. यावेळी भाजपा उत्तर भारतीय मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष लेखराज सोलंकी, भाजपा उत्तर भारतीय मोर्चा छत्रपती संभाजीनगर पश्चिमचे नरेंद्रसिंह यादव, उदय प्रतापसिंग तोमर, शहर अध्यक्ष कैलाश यादव, राजेश सिंह, मनोज तिवारी, अरुण गौर, उपेंद्र श्रीवास्तव, अमोघा प्रजापती, रमेश सुरनू गिरी, शिवनाथ गिरी, राजेश सिंग, मनोज तिवारी, अरुण गौर, उपेंद्र श्रीवास्तव. भारद्वाज, बच्चा सिंग, राजेश पारसनाथ सिंग, अरविंद सिंग आदींची उपस्थिती होती.
