
वाळूजमहानगर, (ता.30) – श्री राम नवमी निमित्त रांजणगाव (शेणपुंजी) येथे आयोजन बैठक रविवारी (ता.31) रोजी सायंकाळी सहा वाजता होणार आहे
गेल्या वर्षा प्रमाणे यावर्षीही रामनवमी मोठ्या उत्साहाने साजरी करण्याचे योजिले आहे. त्याबाबत रूपरेषा तयार करण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी (ता.31) रोजी सायंकाळी 6 वाजता धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज उद्यान, रांजणगाव (शेणपुंजी) छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी होणाऱ्या या बैठकीस सर्व रामभक्तांनी उपस्थित राहावे. असे आवाहन सार्वजनिक रामनवमी महोत्सव 2024 रांजणगाव (शे. पु.) ता. गंगापूर जि. छत्रपती संभाजीनगर त्यांच्या वतीने करण्यात आले आहे.
