वाळूजमहानगर (ता.15) : – न्यू शहीद भगतसिंह विद्यालय, रांजणगाव (शेणपुंजी) येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करून पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती सोमवारी (ता.14) रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती पूर्ण भारतात बालदिन म्हणून मोठ्या उत्सहात साजरी केली जाते. या बालदिनाचे औचित्य साधून शाळेत 14 नोव्हेंबर ते 21 नोव्हेंबर पर्यंत विविध क्रीडा स्पर्धा तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका भारती साळुंके होत्या. यावेळी क्रीडासाप्ताहचे उद्घाटक पोलीस उपनिरीक्षक राजेश वाघ, राजू मोरे, रमाकांत पठारे व प्रमुख पाहुणे साहित्यिक बी. जी. गायकवाड, माजी सैनिक नानासाहेब हरकळ, सचिव हर्षित हरकळ, अक्षय हरकळ, संजय काळे, क्रीडाशिक्षक करण लघाणे यांची उपस्थिती होती. तसेच बालगीतांची मैफिल कार्यक्रमासाठी अप्पासाहेब मिसाळ, संगीता मुंडकर, जगदीश दिघे यांची उपस्थिती होती. याप्रसंगी मार्गदर्शन करताना पोलीस उपनिरीक्षक राजेश वाघ यांनी विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकासासाठी स्पर्धा आवश्यक असून प्रत्येक स्पर्धेत जिद्दीने उतरा व दुसऱ्यांना हरवण्यासाठी नाही तर स्वतःला जिंकण्यासाठी स्पर्धा करा. असा लखमोलाचा सल्ला दिला. उद्घाटनीय सामन्यात अकरावी कॉमर्स विरुद्ध अकरावी सायन्सने 11 गुणांनी विजय मिळवला. तद्नंतर बालगीतांची मैफिल मध्ये विद्यार्थी तसेच शिक्षकांनी विविध गिते सादर करून जल्लोष साजरा केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्कर्ष आहेर यांनी तर आभार रेणुका पांडे यांनी मानले.