February 5, 2026


वाळूजमहानगर, ता.15 (बातमीदार)- रांजणगाव (शेणपुंजी) येथे उपजिल्हाधिकारी भूसंपादन छत्रपती संभाजीनगर डॉ. सुचिता शिंदे तसेच गंगापूर तहसीलदार नवनाथ वगवाड यांच्या अध्यक्षतेखाली महसूल मंडळ वाळूज अंतर्गत बुधवारी (ता.15) जानेवारी रोजी फेरफार आदालत घेण्यात आली.


या फेरफार अदालत अंतर्गत नागरिकांचे प्रलंबित असलेले फेरफार, तक्रारी फेरफार, निकाली काढण्यात आले. तसेच नागरिकांच्या इतर समस्या सोडवण्यात आल्या. या कार्यक्रमासाठी गावातील तसेच महसूल मंडळातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे नियोजन तहसील कार्यालय गंगापूर अंतर्गत वाळूजचे मंडळ अधिकारी एस आर भिंगारे, ग्राम महसूल अधिकारी एस एन पवार, रांजणगाव (शेणपुंजी)चे ग्राम महसूल अधिकारी सि एफ माळी, शिवराई सज्जाचे ग्राम महसूल अधिकारी उदय कुलकर्णी, पिंपरखेडाचे ग्राम महसूल अधिकारी देवकर आप्पा तसेच महसूल सेवक अमोल खैरनार, गणेश गवते, विलास ताटे यांनी आयोजन केले आहे. कार्यक्रमास रांजणगाव ग्रामपंचायतचे सरपंच प्रभाकर महालकर, ग्रामपंचायत सदस्य दत्तू हिवाळे, साईनाथ जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *