वाळूजमहानगर (ता.27) :- रांजणगाव येथे एम जी ऑफ स्कूल ऑफ फिजिओथेरपी आणि ग्रामपंचायत रांजणगाव शेनपुंजी यांच्या संयुक्त विद्यमानाने श्री संत सावता माळी मंदिर परिसरात नागरिकासाठी फिजिओथेरपी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सरपंच कांताबाई जाधव यांच्या हस्ते सकाळी 10 वाजता उदघाटन करून शिबिराला सुरुवात करण्यात आली.
यावेळी उपसपंच शिवराम ठोबरे, जि प सदस्य उषा हिवाळे, पंचायत समिती सदस्य दीपक बडे, ग्रामपंचायत सदस्य नंदीनी संतोष लोहकरे, पंकज हिवाळे, कविता हिवाळे, सय्यद सायराबानो जावेद, साईनाथ जाधव, अशोक जाधव, संजीवनी दिपक सदावर्ते, योगिता प्रभाकर महालकर, मोहनीराज धनवटे, संदीप मनोहरे, अश्विनी हिवाळे, सत्यशिला शहाजी सुरुंग, नंदाबाई बडे, निर्मला बबन पठाडे, भिमराव कीर्तीकर, ग्रामविकास अधिकारी सुरेश रोहोकले आदीची प्रमुख उपस्थिती होती. या शिबिरात ह्रदयरोग, फुफूस, हाडाचे आजार,बीपी, शुगर या आजाराने त्रस्त असलेल्या नागरिकाची तपासणी करुन त्यांना फिजिओथेरपी उपचार म्हणजे गोळ्या न घेता व्यायाम करून आपण कसे बरे होऊ शकता याबाबत या शिबीरात मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी डाँ. जुनेश्वर बिडवे, डॉ. श्रीकांत म्हसे, डॉ सबी खान यासह 25 फिजीओथेरपीचे मास्टर विद्यार्थी यानी जवळपास 300 नागरीकांना फिजिओथेरपी शिबीरात सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी संत सावता माळी, हनुमान मंदीर ट्रस्ट अध्यक्ष गोरखनाथ हिवाळे, बाबुराव हिवाळे, साहेबराव गवळी, देविदास जाधव, गोरख बोर्हाडे, गणेश गायके, दिपक काळे, वैभव देसाई यासह मोठ्या संख्येने नागरिकाची उपस्थिती होती.
