March 22, 2026

वाळुज महानगर (ता.30) – वाळुज औद्योगिक परिसरात अवैधधंदे अद्यापही सुरूच असून पोलिसांनी रविवारी 28 डिसेंबर रोजी टाकलेल्या छाप्यात एका आरोपीला जेरबंद करून त्याच्या ताब्यातून एक हजार दोनशे रुपये किमतीची देशी दारू जप्त करण्यात आली. ही कारवाई रांजणगाव,(शेणपुंजी) येथे सायंकाळी सव्वा सहा वाजेच्या सुमारास करण्यात आली.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की वाळुज एमआयडीसी ठाण्याचे निरीक्षक रामेश्वर गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सुरेश कचे, अंमलदार नितीन इनामे, प्रकाश तागड हे रविवारी 28 डिसेंबर रोजी सायंकाळी गस्त घालत असताना त्यांना माहिती मिळाली की, रांजणगाव (शेणपुंजी) येथील नुराणी मस्जिद जवळ पत्र्याच्या शेड मध्ये अवैधरित्या देशी दारुची चोरटी विक्री सुरू आहे. त्यामुळे तेथे पोलिसांनी 6:15 वाजेच्या छापा मारला असता, तेथे आरोपी राजगुरु जयवंत काळे (वय 40 वर्षे) रा. दत्त मेडीकल जवळ, रांजणगाव (शे.पु.) ता. गंगापूर जि. छत्रपती संभाजीनगर हा मिळून आला. त्याच्या ताब्यात 180 एम एलच्या प्रत्येकी 80 रुपये किंमतीच्या 15 प्लास्टीकच्या 1 हजार 200 रुपये किमतीच्या देशी दारूच्या बाटल्या मिळून आल्याने त्या जप्त करण्यात आल्या. याप्रकरणी पोलिस अंमलदार संदिप प्रकाश तागड (वय 36 वर्ष) यांच्या फिर्यादीवरून वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *