March 23, 2026


वाळुज महानगर, (ता.5)- रांजणगाव येथे पल्स पोलिओ मोहिमेचे उद्घाटन सरपंच योगिता प्रभाकर महालकर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास लताताई शिवराम ठोंबरे, पंचायत समिती सदस्य दीपक बडे, सोमनाथ नेमाने, गणेश हिवाळे उपस्थित होते.

रांजणगाव (शेणपुंजी) येथे एकूण 38 बुथ आहेत. गावातील 0 ते 5 वर्ष वयोगटातील अपेक्षित एकूण लाभार्थी 12 हजार 933 आहेत. या सर्व बालकांना पोलिओची लस बूथवर पाजण्यात आली. उर्वरित बालकांना आरोग्याची टीम घरोघर जाऊन पोलिओची लस देत आहे. ही मोहीम यशस्वी करण्याकरिता प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत दाते यांच्या मार्गदर्शनाखाली उपकेंद्राचे आरोग्यसेविका रूपाली आदापुरे, उज्वला सातपुते, पुष्पलता जाधव, आरोग्य सेवक किरण काथार, विशाल करडीवाल, किरण यादव, गटप्रवर्तक जया वरपे व ऊपकेंद्राच्या आशा कार्यकर्ती व अंगणवाडी कार्यकर्ते तसेच मदतनीस परिश्रम घेत आहेत. यावेळी मार्गदर्शन करताना 100 टक्के लसीकरण करण्याचे आव्हान दिपक बडे यांनी केले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *