वाळूजमहानगर (ता.25) – शहीद भगतसिंह विद्यालय, विद्याभारती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, रवींद्रनाथ इंग्लिश स्कूल रांजणगाव (शे. पु.) यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत निपुण महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या वाचन अभिव्यक्ती वाढीसाठी परिस स्पर्श कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका भारती साळुंके या तर उद्घाटक म्हणून गटशिक्षणाधिकारी समाधान आराख व माजी सैनिक नानासाहेब हरकळ यांची तर प्रमुख पाहुणे तथा मार्गदर्शक म्हणून डॉ. वैशाली जहागीरदार, सुनिता राठोड वरिष्ठ अधिव्याख्याता जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था औरंगाबाद, विशेष साधन व्यक्ती सुमती काळगे, गणेश गवांदे, देविदास सूर्यवंशी, सचिव हर्षित हरकल, कोषाध्यक्ष नीताताई साळुंके, सुंदर माझी शाळा कार्यक्रमाचे निर्माते गणेश घुले, गायक श्रीराम पोतदार, इलियाज सय्यद, मुख्याध्यापक संजय काळे, यांची उपस्थिती होती.
विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी म्हणून मागील तीन महिन्यापासून प्रत्येक शनिवार वाचन दिन म्हणून साजरा केला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून विद्यार्थ्यांना अधिक गोडी लागावी यासाठी परिसरातील, पाठ्यपुस्तकातील लेखक, कवी विद्यार्थ्यांचे वाचन व लेखन कौशल्य विकसित करावे. असे वैशाली जहागीरदार यांनी स्पष्ट केले. म्हणूनच आज रोजी सुंदर माझी शाळा कार्यक्रमाचे गणेश घुले, श्रीराम पोतदार यांनी विद्यार्थ्यांना अनेक विविध बोधपर मनोरंजक तसेच जनजागृतीपर गीतातून विद्यार्थ्यांचे प्रबोधन करण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शहीद भगतसिंग विद्यालय विद्याभारती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय रवींद्रनाथ इंग्लिश स्कूलच्या सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चेतन बोरोले यांनी तर आभार अप्पासाहेब सोनवणे यांनी मानले.