
वाळूजमहानगर, (ता.8) – रांजणगाव (शे.पु.) येथे ग्रामपंचायत कार्यालयात 23 लाभार्थ्यांना जवळजवळ पाच लाख 40 हजार रुपये किमतीच्या विविध वस्तुंचे वाटप शुक्रवारी (ता.7) रोजी करण्यात आले. यामध्ये झेरॉक्स मशीन 9, शिलाई मशीन 11, सायकल 2, कॉम्पुटर 1 या साहित्याचा समावेश आहे. पंचायत समिती 20 टक्के शेष फंडातुन मागासवर्गीयांना हा लाभ देण्यात आला.
यामध्ये झेरॉक्स मशीनच्या लाभार्थीना प्रत्येकी 43 हजार 70 रुपये, शिलाई मशीनच्या लाभार्थीना 9 हजार 300 रुपये, कॉम्पुटर लाभार्थीना प्रत्येकी 42 हजार 600 रुपये, सायकल लाभार्थीना प्रत्येकी 3 हजार 500 रुपये प्रमाणे 7 हजार अशा एकुण 23 लाभार्थ्यांना 5 लाख 39 हजार 530 रुपये लाभ पंचायत समिती 20 टक्के शेष फंडातुन मागासवर्गीयांना देण्यात आला.
या याजनेचा लाभ मिळवुन देण्यासाठी पंचायत समिती सदस्य दिपक बडे यांनी पाठपुरावा केला. या साहित्याचे (वस्तु) वाटप ग्रामपंचायत कार्यालय रांजणगाव (शे.पु.) येथे शुक्रवारी (ता.7) रोजी करण्यात आले.
या योजने मध्ये मनिषा कानडे, सीमा नरवडे, प्रतिक्षा घुसळे, बायडाबाई तौर, सुभाष दाभाडे, सिमा जाधव, भारती कांबळे, आम्रपाली गोवंदे, कासाबाई भिसे, जोत्सना दोडके, आरती किर्तीशाही, सरस्वती हजारे, आश्विनी कोतकर, सुनंदा गायकवाड, कल्पना घुसळे, अस्मिता इंगळे, छाया धस, अनिता आव्हाड, वैशाली पगारे, सुमन शेजवळ, निता देबाजे, आश्विनी धस, आदींचा लाभार्थीमध्ये समावेश आहे.
या मिळालेल्या साहित्यातुन लाभार्थ्यांना रोजगारांच्या माध्यमातुन आर्थिक हातभार लागणार असल्याने लाभार्थ्याच्या चेह-यावर आनंद दिसत होता. आमदार प्रशांत बंब यांनी या सर्व लाभार्थीना हा लाभ मिळवुन देण्यासाठी मदत केली.
यावेळी ग्रामविकास अधिकारी गणेश धनवई, माजी सरपंच मोहनीराज धनवटे, पंचायत समिती सदस्य दिपक बडे, सामजिक कार्यकर्ते शरद किर्तीकर, शिवाजी दामोदर, लक्ष्मण वैष्णव, अमर तरटे, भिमराव किर्तीकर, सुलोचना गोडबोले आदिची उपस्थिती होती. 
स्तुत्य उपक्रम –
दीपक बडे यांनी केलेला उपक्रम आहे. असे उपक्रम आमचे मित्र करत असतातच. याशिवाय अभ्यासाच्या दृष्टिकोनातून ज्या विद्यार्थ्यांना एमपी, युपीसीच्या अभ्यासासाठी लागणारी पुस्तके लागणार असतील तर, मी स्वतः उपलब्ध करून देणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांची यादी द्यावी.
