वाळूजमहानगर, ता.25 – रांजणगाव शेणपुंजी येथील एका 48 वर्षे इस माने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. शुक्रवारी (ता.24) रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास झालेल्या या घटनेचे कारण मात्र समजून शकले नाही.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जगन भिकाजी दराडे (वय 48) रा. किनखेडा ता. कारंजा जि. वाशिम हा रांजणगाव (शेणपुंजी) येथील विवेकानंद कॉलनीत राहत होता. त्याने राहत्या घरी शुक्रवारी (ता.24) रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास दोरीच्या साह्याने गळफास घेतला. ही घटना उघडकिस येताच त्याला बेशुध्द अवस्थेत कविता दराडे व विष्णु सानप यांनी उपचारार्थ घाटीत दाखल केले. त्यावेळी डॉक्टरांनी तपासुन त्यास मृत घोषीत केले. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलीस निरीक्षक रामेश्वर गाढे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार पोह मंगेश मनोरे करीत आहे.