वाळूजमहानगर, (ता.3) – वाळूज परिसरातील रांजणगाव (शेणपुंजी) येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती शुक्रवारी (ता.31) रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
प्रथम सकाळी रांजणगाव फाट्यावरील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाचे पूजन व सांयकाळी सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. सायंकाळी 5 वाजता स्मारकापासून सुरू झालेली ही मिरवणूक रात्री 8 वाजेपर्यंत सुरू होती. रांजणगाव येथील वेगवेगळ्या मार्गावरून ही मिरवणूक जाऊन कमळापुर फाटा येथे मिरवणुकीची सांगता झाली. यावेळी निखिल कोळेकर, गजानन बोंबले, सविता शिंदे, माजी समाज कल्याण समिती सभापती विठ्ठल कोळेकर, साखराबाई तोगे, अनिल वाढोनकर, गणेश तोगे, राजु गोरे, दिपक गोरे, विजू तोगे, वीर मामा, राजु गवळी, तोगे मॅडम, लक्ष्मी फुके, शकुंतला गोरे, उषा ढेपले, अनिता काटकर, दत्तात्रय रोडगे, गणेश वैद्य, रवि पवार यांच्यासह सर्वच समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अहिल्या देवी स्मारक समिती व सकल धनगर समाज आदींनी परिश्रम घेतले.