वाळूजमहानगर – वाळूज औद्योगिक वसाहतीतील चंद्रा मँट या कंपनीतील 20 वर्षीय तरुण कामगार रांजणगाव (शेणपुंजी) या परिसरातील गणेश वसाहत येथे राहत होता. तो मंगळवारी (ता.11) रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास बेपत्ता झाल्याचे उघडकीस आले.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रोहित कृष्णगोपाल सिंग वय 20 वर्ष हा वाळूज औद्योगिक वसाहतीतील चंद्रा मॅट या कंपनीत काम करत होता. तो राहत्या घरून बेपत्ता झाल्याचे मंगळवारी (ता.11) रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास उघडकीस आले. त्याचा परिसरात व नातेवाईकांकडे शोध घेतला. मात्र तो मिळून आला नाही. या प्रकरणी त्याचा भाऊ दीपक कृष्णगोपाल सिंग यांच्या खबरीवरून वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात हरवल्याची नोंद करण्यात आली आहे. रोहित सिंग याचा शोध पोलीस निरीक्षक संदीप गुरुमे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार रामचंद्र बिघोत घेत आहे.