February 5, 2026


वाळूज महानगर, (ता.6) – वाळूज परिसरातील आठवीत शिकणाऱ्या एका 13 वर्षीय 11 महीने मुलाचे कोणीतरी अज्ञात व्यक्तीने काहीतरी कारणासाठी अपहरण केले. ही घटना रांजणगाव (शेणपुंजी) येथे रविवारी 4 जानेवारी रोजी दुपारी घडली.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, साई गुलाबराव देशमुख हा 13 वर्ष 11 महिने वयाचा विद्यार्थी रांजणगाव (शेणपुंजी) येथील श्रीराम मंदिर जवळ कुटूंबासह राहतो. तो वेरूळ येथील संत जनार्दन स्वामी आश्रम येथे इयत्ता 8 वीच्या वर्गात शिक्षण घेतो. शाळेला सुट्टी असल्याने साई हा रांजणागव येथे घरी आला होता. रविवारी चार जानेवारी रोजी सकाळी 8 वाजता त्याची आई कंपनीत गेली होती. दुपारी 12 वाजेच्या सुमारास सार्ई हा मेडिकल मध्ये गोळ्या घेऊन येतो. असे म्हणून घरातून गेला. बराच वेळ झाला तरी तो घरी आला नाही. म्हणून साईच्या मामाने त्याच्या आईस फोन करून सांगितले. त्यांनतर कुटूंबीयांनी आजूबाजूला इतत्र शोध घेतला असता तो मिळून आला नाही. त्यामुळे त्यास कोणीतरी अज्ञात आरोपींनी अज्ञात कारणासाठी फुस लावून पळून नेल्याची शंका आल्याने सोनाली देशमुख यांनी वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *