
वाळूजमहानगर, (ता.2) – श्री बसवंतराव पाटील प्राथमिक व माध्यमिक इंग्रजी शाळा, रांजणगाव (शे. पु.) येथे महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी ध्वजारोहणाचा कार्यक्रम संस्थेचे अध्यक्ष आई जी जाधव यांच्या हस्ते पार पाडण्यात आला. शाळेतील पालक प्रतिनिधींची उपस्थिती देखील होती.
याप्रसंगी शाळेतील प्रत्येक वर्गातील प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरलेल्या पाचवी मधील आदित्य साईसिंग भगिले, प्रियांशू साहेबराव खाडे, आदित्य दिपक कौटकर, आदित्य तुषार राऊत, सार्थक शिवाजी सोनावणे आणि आठवी मधील ओम रघुनाथ रनमळे, आर्यन संदीपराव मेषराम, तेजस्विनी कुंडलिक डाकुरकर, प्रदिप व्यंकटराव शिंदे, वैष्णवी साहेबराव खाडे, भक्ती बाबासाहेब पवार या विद्यार्थ्यांचा ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी शाळेतील पठारे सरांनी महाराष्ट्रातील संताचे कार्य, इतिहासकालीन राजांची कार्ये यावर आधारित भाषणे, गीते सादर केली. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष आय.जी.जाधव, श्री गजानन प्राथमिक विद्या मंदिरच्या मुख्याध्यापिका सुरेखा बस्वदे, याप्रसंगी संस्थेचे सचिव हरीश जाधव, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक एम.व्ही.शिनगारे, मीरा देशपांडे, बी व्ही शिरसाठ, रेखा बिदरकर, लता वैष्णव, ममता खोतकर, पूजा खोतकर, पूजा ठाकूर, बिंदु प्रजापती, धनंजय जाधव, संभाजी जाधव, निलेश मिसाळ व शिक्षक यांची उपस्थिती होती. रेखा बिदरकर यांनी नियोजन केलेल्या या कार्यक्रमाचे आभार संभाजी जाधव यांनी मानले.
