वाळूजमहानगर, (ता.23) – वाळूज परिसरातील रांजणगाव (शेणपुंजी,) येथील राम मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमासह अभिषेक, महापूजा, महाआरती,
महाप्रसाद व भव्य मिरवणूक काढून सोमवारी (ता.22) रोजी रामोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
प्रथम स पहाटे 4.30 राम मूर्तीस जगन्नाथ गोलारे, विठ्ठल वीर यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला. त्यानंतर राम नाम जप, महाआरती होऊन महाप्रसादाचा कार्यक्रम झाला.
सायंकाळी चार चाकी वाहनातून प्रभू श्रीरामाच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत राम, लक्ष्मण, सीता व हनुमान यांची वेशभूषा केलेल्या मुलांनी सहभाग घेतल्याने ते सर्व राम भक्तांचे आकर्षण ठरले. राम मंदिरापासून सुरू झालेली ही मिरवणूक दत्त नगर फाटा, कमलापूर फाटा, ग्रामपंचायत कार्यालय, लक्ष्मी माता मंदिर मार्गे पुन्हा राम मंदिरात येऊन विसर्जित झाली.
सायंकाळी दीपोत्सवाचे आयोजन करून कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राम मंदिर समितीचे गंगाराम हिवाळे, आप्पासाहेब मगरे, भाऊसाहेब भांबर्डे, संजय खैरनार, गजानन दोडके, बाळू मालोदे, संजय वाघ, गोरखनाथ वळेकर, भगवान मखरे, प्रकाश साळुंके, भाऊसाहेब सोनवणे, रामनाथ कर्डीले, संतोष कुटे, संतोष लाजिरे, गणेश हिवाळे, योगेश तुपे त्यांनी परिश्रम घेतले.
