
वाळूजमहानगर, (ता.3) – आषाढी एकादशी निमित्त वाळूज परिसरातील छोटे पंढरपूर येथे दर्शनासाठी केलेला रांजणगाव (शेणपुंजी) येथील 38 वर्षीय भाविक अद्यापही घरी परतला नाही. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात तो बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे. 
सुरेश धर्मा राठोड वय 38 वर्षे रा. दत्त मेडिकल समोरील गल्ली, रांजनगाव (शे.पु.) ता गंगापूर जि. छत्रपती संभाजीनगर असे बेपत्ता झालेल्या भाविकांचे नाव आहे. तो तब्येत खराब असल्याने घरीच असतो. आषाढी एकादशी निमित्त तो गुरुवारी (ता.29) रोजी सकाळी 9 वाजेच्या सुमारास दिडित जावुन देवाचे दर्शन घेवुन येतो. असे सांगुन गेला. तो परत आला नाही. म्हणुन त्याचा आजुबाजुचे व परिसरात शोध घेतला. परंतु तो मिळून आला नाही. रंग सावळा, उंची 5.6, केस काळे, कान मोठे, नाक जाड, चेहरा लांब, डोळे काळे, पायात चप्पल, भाषा मराठी, बंजारा, हिंदी, अंगात पांढरा शर्ट व निळ्या रंगाची पॅन्ट, डाव्या हातावर कविता, बादल असे नाव गोंधळलेले आहे. त्याचे वर्णन आहे. याबाबत कोणास काही माहिती मिळून आल्यास वाळुज एमआयडीसी पोलिसांशी संपर्क साधावा. असे आवाहन पोलीस अंमलदार रामचंद्र बिघोत यांनी केले आहे.
