February 5, 2026


वाळूज महानगर, (ता.30) – वाळूज औद्योगिक वसाहतीतील रांजणगाव (शेणपुंजी) फाट्यावर मराठा आरक्षणासाठी संतप्त महिलांनी आरक्षण विषयक सकारात्मक तसेच सरकार विषयक प्रतीकात्मक विविध घोषणा देत सोमवारी (ता.30) रोजी अचानक रस्ता रोको केल्याने पोलिसांची चांगलीच धावपळ झाली.

वाळूज औद्योगिक वसाहतीतील रांजणगाव (शेंपु) फाटा येथे मराठा आरक्षणासाठी महिलांनी सोमवारी (ता.30) रोजी सकाळी मराठा आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, एक मराठा कोटी मराठा, या सरकारचं करायचं काय?, मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे, अशा घोषणा देत रास्ता रोको आंदोलन केले.

तसेच प्रतीकात्मक घोषणा देत शासनाचा निषेध करण्यात आला. या रास्ता रोको आंदोलनामुळे काही काळ वाहतूक व्यवस्था कोलमडली होती. अचानक करण्यात आलेल्या या रास्ता रोकोमुळे पोलिसांची चांगलीच धावपळ झाली. मात्र वेळीच मध्यस्थी करून महिलांना समज देऊन रास्ता रोको आंदोलन शमले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *