
वाळुज महानगर (ता.4) – रांजणगाव (पोळ) येथे श्री काशी विश्वनाथ महाराज यांच्या यात्रा महोत्सवाला बुधवारी 3 डिसेंबर रोजी सुरुवात झाली. तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात संदल मिरवणूक, छबीना मिरवणूक, चादर चढवणे, तसेच मनोरंजनाच्या कार्यक्रमासह कुस्त्यांची दंगल होणार आहे.
हिंदू मुस्लिम समाजाचे दैवत समजल्या जाणाऱ्या या श्री काशी विश्वनाथ महाराज या महोत्सवाला बुधवार तीन डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजता संदल मिरवणुकीने सुरुवात झाली. तीन दिवसीय चालणाऱ्या या यात्रा महोत्सवास गुरुवारी 4 डिसेंबर रोजी सायंकाळी आठ वाजता छबिना मिरवणूक निघून श्री काशी विश्वनाथ महाराज यांना चादर चढवण्यात येणार आहे. त्यानंतर साडेआठ वाजता सीने अभिनेत्री मयुरी उतेकर यांच्या महाराष्ट्राची लोककला “सबसे हटके, मयुरी के झटके” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच शुक्रवार पाच डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजता भव्य कुस्त्यांच्या दंगलीचे आयोजन करण्यात आले आहे. या यात्रा महोत्सवाचा परिसरातील भाविकांनी लाभ घ्यावा.असे आवाहन श्री काशी विश्वनाथ महाराज संस्थान व यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.
—————–
