
वाळूज, महानगर ता. 2) – गंगापूर तालुक्यातील रांजणगाव शेणपुंजी येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची त्रिशताब्दी जयंती 31 मे रोजी विविध उपक्रमांनी मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली. तत्पूर्वी 30 तारखेला रात्री 8:30 वाजता भव्य दीपोत्सव साजरा करण्यात आला.
प्रथम पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या फॅमिली शनिवारी (ता. 31) सकाळी 8:30 वाजता विधियुक्त पुजन करून दूध अभिषेक करण्यात आला. व महाआरती करून महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. मल्हार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष रामदास दादा कोळेकर, पंचायत समिती सदस्य दीपक बडे यांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून भव्य दिव्य मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. यावेळी माजी सभापती साखराबाई तोगे, नारी शक्तीच्या सविता शिंदे, राजू गवळी, अनिल वाढोणकर, विजय तोगे, संजय तोगे, विलास पाचपोळ, राज येवले, विठ्ठलराव वीर, दत्तात्रय रोडगे, राजू साबळे, वडकुते पाटील, सोनाग्रे साहेब, सूर्यकांत सोडगीर, बाबासाहेब रिटे, गणेश तोगे, राजू पिसाळ, अन्नपूर्णा सोनाग्रे आदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
