वाहनधारकांनो सावधान!
वाळूज महानगर :- रांजणगाव (शेणपुंजी) येथील दोन दुचाकी एकाच रात्री अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना 15 ऑक्टोबर रोजी सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुध्द एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एकतानगर, रांजणगाव (शेणपुंजी) येथील राजीव पुंजाजीे जुमडे याने त्याची दुचाकी (एमएच 28, बीजे -6065) ही 14 आँक्टोबर रोजी रात्री नेहमीप्रमाणे घरासमोर उभी केली होती. ती अज्ञात चोरट्यांनी संधी साधुन चोरुन नेली असल्याचे दुसऱ्या दिवशी सकाळी उघडकीस आले. तसेच येथीलच शेजारी राहणारे राजेक शफीमिया शेख यांचीही दुचाकी गायब असल्याचे समजले. समजले. या दोन्ही दुचाकी चोरी प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाळुज परिसरात दुचाकी चोरीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले असून पोलिसांच्या आदेश वजा सल्ल्ल्याचे वाहनधारकांकडून दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते.