February 5, 2026

 

वाळूज महानगर (ता.10) – कॅज्युअल मध्ये कंपनीत काम करणाऱ्या एका 31 वर्षीय कामगाराने दारूच्या नशेत छताला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला. ही घटना बुधवारी 10 डिसेंबर रोजी सकाळी 6:30 वाजेच्या सुमारास रांजणगाव (शेणपुंजी) येथे उघडकीस आली.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, करनखेड ता. चिखली जि. बुलढाणा येथील सुनील दशरथ खरात (वय 31 वर्ष) हा कुटुंबासह वाळूज परिसरातील रांजणगाव (शेणपुंजी) येथे राहत होता. तो एका खाजगी कंपनीत कॅज्युअल काम करत असे. त्याला नशेचे व्यसन होते. त्याने नशेमध्येच घराच्या छताला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतल्याने बेशुद्ध झाला. बुधवारी 10 डिसेंबर रोजी सकाळी 6:30 वाजताच्या सुमारास ही घटना उघडलीस आली. त्याला बेशुद्ध अवस्थेत भीमराव खरात व विजय खरात यांनी घाटी रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी त्याची तपासणी करून मृत घोषित केले. याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार केशव चौथे करीत आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *