
वाळूज महानगर – वाळूज औद्योगिक परिसरातील रांजणगाव (शे.पु) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी कविता बाबुराव हिवाळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यांनी निवडणूक प्रक्रियेत 17 पैकी 14 ग्रामपंचायत सदस्यांनी सहभाग नोंदवला. निवडणुकीनंतर गुलाल उधळून फटाक्याची आतिशबाजी करण्यात आली.

वाळूज महानगरातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या रांजणगाव ग्रामपंचायतीची जानेवारी 2021 रोजी निवडूक झाली होती. या निवडणुकीत आमदार प्रशांत बंब यांच्या पॅनलने सर्वाधिक जागा जिंकून आणल्या. त्यामुळे कांताबाई अशोक जाधव यांची सरपंचपदी निवड करण्यात आली होती. इतरांना सरपंच पदाची संधी मिळावी. यासाठी 2023 मध्ये कांताबाई जाधव यांनी राजीनामा दिला. आणि सरपंचपदी योगिता प्रभाकर महालकर या विराजमान झाल्या. त्यानंतर ठरल्याप्रमाणे महालकर यांनी सुद्धा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या सरपंचपदाच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी 17 ऑक्टोंबर रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत निवडणूक प्रक्रिया राबवण्यात आली.
यावेळी अध्यासी अधिकारी तथा मंडळ अधिकारी सचिन भिंगारे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या विशेष सभेला 17 पैकी माजी सरपंच योगिता प्रभाकर महालकर, नंदिनी संतोष लोहकरे, पंकज गोरखनाथ हिवाळे, कविता बाबुराव हिवाळे, सायराबानो जावेद सय्यद, साईनाथ बाबुराव जाधव, कांता अशोक जाधव, संजिवनी दीपक सदावर्ते, मोहनीराज मुरलीधर धनवटे, संदीप सिताराम मनोहरे, सत्यशिला शहाजी सुरुंग, भिमराव फकिरराव किर्तीशाही, निर्मला बबन पठाडे, नंदाबाई हरेराम बडे या 14 ग्रामपंचायत सदस्यांनी सहभाग घेतला. सरपंचपदासाठी कविता बाबुराव हिवाळे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहिर केले. त्यांना ग्रामपंचायत अधिकारी गणेश धनवई यांनी सहकार्य केले. सरपंच पदी कविता हिवाळे यांची निवड होताच गुलालाची उधळण करत फटाक्याची आदर्श बाजी करण्यात आली.
