वाळूजमहानगर, (ता.25) – गाडी खरेदी विक्रीच्या व्यवहारातून झालेल्या वादामुळे चार चाकी वाहनाची तोडफोड करून रस्त्यावर झुंज खेळणाऱ्या तीन जणांना वाळूज पोलिसांनी पकडून ताब्यात घेतले. हा प्रकार शुक्रवारी (ता.24) रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर गंगापूर रोड वरील वाळूज येथे घडला.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, आरोपी सचिन सुनिल वाडकर वय 32 वर्षे, प्रविण सुनिल वाडकर वय 34 वर्षे दोन्ही रा. गुरुदक्षिणा अपार्टमेंट, पाईपलाईन रोड, सिडको वाळूज महानगर -1, व केदार संजय खोचे वय 28 वर्षे रा. लघाने हॉस्पीटलजवळ वाळूज. हे गाडी खरेदी विक्रीच्या कारणावरून दारूचे सेवन करून सार्वजनिक ठिकाणी रोडवर आपापसात शिवीगाळ करुन जोरजोराने आरडाओरड करून एकमेकांनी झुंज करत होते. यावेळी त्यांच्या वादात चार चाकी कार एम एच 20, 300) वर दगडफेक करून नुकसानही केले. शुक्रवारी (ता.24) रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर ते गंगापूर रोडवरील एचडीएफसी बँकेच्या एटीएम समोर वाळूज येथे हा प्रकार सुरू असताना बघ यांची मोठी गर्दी झाली घटनेची माहिती मिळताच वाळूज पोलिसांनी तात्काळ धाव घेत झुंज खेळणाऱ्यांना पॉलिसी खाक्या दाखवत ताब्यात घेतले. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक नारायण कोंडीराम बुट्टे यांच्या फिर्यादीवरून वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सचिन इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक मनीषा केदार करीत आहे.
पोलिसांना ही शिवीगाळ –
वाळूज येथे छत्रपती संभाजीनगर – गंगापूर रोडवर अत्यंत रहदारीच्या ठिकाणी सुरू असलेली ही झुंज लक्षात येताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आणि आरोपींना ताब्यात घेत असताना आरोपी प्रवीण वाडकर आणि सचिन वाडकर यांनी सरकारी कामात अडथळा निर्माण करून पोलिसांना शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. तसेच शासकीय मालमत्तेचे नुकसान केले. त्यामुळे पोलिसांनाही त्यांना पॉलिसी खाक्या दाखवला..
————-+
