March 24, 2026

वाळूजमहानगर, (ता.25) – दुचाकीवर जाणाऱ्या 24 वर्षीय कामगारास दोन जणांनी रस्त्यात अडवून चाकूचा धाक दाखवत मारहाण करून खिशातील रोख रकमेसह इतर साहित्य बळजबरीने हिसकावून पळ काढला. ही घटना रविवारी (ता.23) रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास वाळूज परिसरातील ए एस क्लब चौकाजवळ घडली.


रवी जगननाथ लहाने वय 24 वर्ष, रा. वाकोद ता. फुलंब्री जि. छत्रपती संभाजीनगर (ह.मु. महादेव मंदीराजवळ बजाजनगर) हे दुचाकी (एमएच 20, एफ एन – 9075) वरुन रविवारी (ता.23) रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास बजाजनगर येथून छत्रपती संभाजीनगरकडे जात होते. आरोपी रोहीत गणेश अंभुरे वय 20 वर्ष, अभय विनोद जाधव वय 20 वर्ष दोघे रा. महाडा कॉलनी तिसगांव ता.जि.छत्रपती संभाजीनगर यांनी संगणमत करून लहाणे यांची दुचाकी आडवून चाकूचा धाक दाखवून त्यांच्या खिशातील रोख 1 हजार रुपये, आधारकार्ड, बी.के.टी कंपनीचे कँन्डीनचे कुपन, पैशाचे पाकीट असा ऐवज बळजबरीने हिस्कावून घेऊन पळून गेले.

या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात कलम 394, 34 भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस आयुक्त मनोज लोहिया, पोलीस उप आयुक्त
दिपक गिऱ्हे, सहायक पोलीस आयुक्त अशोक थोरात, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीतांना विशेष तपास पथकाचे पोउपनिरिक्षक संदीप शिंदे, पोलीस अंमलदार यशवंत गोबाडे, हनुमंत ठोके यांनी गोपनीय बातमीदाराकडून माहिती घेवून आरोपीतांचा पाठलाग करून सिताफीने अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता बुधवार (ता.26) पर्यंत पोलीस कस्टडी ठोठावण्यात आली.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *