वाळूजमहानगर (ता.23) – रस्त्याने जाणाऱ्या 34 वर्षीय विवाहितेला रस्त्यात अडवून तू माझ्याशी बोलत का नाही. असा प्रश्न विचारत त्याच्याकडील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत, तिचा विनयभंग केला. ही घटना बजाजनगर सोमवारी (ता.21) रोजी बजाजनगर येथे घडली.
वाळूज औद्योगिक वसाहतीतील रांजणगाव (शेणपुंजी) येथील 34 वर्षीय विवाहित महिला सोमवारी (ता.21) रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास कामानिमित्त बजाजनगर येथे जात होती. त्याचवेळी आरोपी आकाश भारत वाठोरे (वय 25) रा. गांधीनगर, रांजणगाव (शेणपुंजी) याने तिचा पाठलाग करत तिला रस्त्यात अडवले व तू मला आवडतेस, माझ्याशी बोलत का नाही? असा प्रश्न विचारत त्याच्याकडील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत पीडित महिलेचा विनयभंग केला. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.