वाळूजमहानगर, (ता.22) – घरापर्यंत जाणाऱ्या रस्त्यावर अतिक्रमण झालेले असल्याने ते हटवण्यात यावे. या मागणीसाठी वारंवार अर्ज, निवेदने देऊनही दुर्लक्ष करत अतिक्रमण न हटवल्याने ग्रामपंचायतला टाळे ठोकण्यात येईल. असा इशारा एका निवेदनाद्वारे लांझी येथील नागरिकांनी दिला आहे.
याबाबत लांझी येथील कल्याण कडुबा सातपुते यांनी लांजी येथील ग्रामसेवक व सरपंच यांना 19 डिसेंबर रोजी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, माझ्या घरापर्यंत येणाऱ्या रस्त्यावर अतिक्रमण झालेले आहे. हे अतिक्रमण हटवण्यासाठी वारंवार अर्ज, निवेदने दिलेले आहे. विशेष म्हणजे पंचायत समितीने ग्रामपंचायतला सुद्धा कारवाई करण्याचे बजावले आहे. तरीही अतिक्रमण जशास तसे आहे. त्यामुळे दररोज येण्या जाण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे हा रस्ता मोकळा करून देण्यात यावा. नसता 26 डिसेंबर रोजी ग्रामपंचायतला काळे ठोकण्यात येईल. अशा इशाराही देण्यात आल्याचे या निवेदनात नमूद आहे.
दरम्यान याबाबत ग्रामसेवक के एस आरु यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, सातपुते याचे गल्लीतील शेवटचे घर आहे. घरापर्यंत जाण्यासाठी अंदाजे दहा फुटाचा रस्ता आहे. यापूर्वी या प्रकरणाचा पंचनामा झाला आहे, या रस्त्यात धार्मिक स्थळ आहे. त्यामुळे अडचण येत आहे. तरीही ग्रामपंचायतच्या मासिक सभेत यावर चर्चा करण्यात येईल. असेही ते म्हणाले.
