March 23, 2026

वाळूजमहानगर, ता.15 – रस्त्यावरील स्पीड लिमिट हे लिमिटसाठी दिलेले नसून आपण त्या मर्यादेच्या आत आपले वाहन चालवले पाहिजे, मोबाईल फोनचा वापर, कानामध्ये हेडफोन घालून गाणे ऐकणे. असे गाडी चालवताना करू नये, आपघातामध्ये आपण आपला जीव गमावतो. त्याचबरोबर आपल्या परिवाराच्या स्वप्नांना सुद्धा गमावतो. रस्ता सुरक्षा ही फक्त घोषणा नाही. तर तो जीवन जगण्याचा एक मार्ग आहे. असे उपदेशपर मार्गदर्शन इप्का लॅबोरेटरी कंपनीचे मानवसंसाधन विभाग प्रमुख डॉ. व्यंकट मैलापूरे यांनी मंगळवारी (ता.15) रोजी केले. 

दिवसेंदिवस वाढणाऱ्या अपघाताच्या घटना टाळण्यासाठी दरवर्षी 11 ते 17 जानेवारी दरम्यान भारतात रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा केला जातो. अनुषंगाने वाळूज येथील इप्का लॅबोरेटरीज लीमिटेड कंपनीने कंपनीतील कामगारांमध्ये वाहतूक नियमांबद्दल जागरूकता करण्यासाठी मंगळवारी (ता.15) जानेवारी रोजी आर.टी.ओ. अधिकाऱ्या मार्फत कंपनीमध्ये मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.


यावेळी आर.टी.ओ. चे अधिकारी संदीप शेलार यांनी कंपनीच्या कर्मचारी, कामगारांना रस्ता सुरक्षाची शपथ देऊन भंगार वाहनांचा अतिरेकी दुरुपयोग कसा करतात, चालकाकडे परवाना नसतो. अशा वेळी वाहन चालवले आणि अपघात झाला तर त्या वाहनाच्या विमा रकमेचा लाभ घेता येणार नाही. यासह वाहतुकीच्या अनेक नियमांबाबत सखोल मार्गदर्शन केले.

या प्रसंगी इप्का लॅबोरेटरी कंपनीचे युनिट हेड संजय चौबे, मानवसंसाधन विभाग प्रमुख डॉ. व्यंकट मैलापूरे, आर.टी.ओ. चे अधिकारी संदीप शेलार, दीपिका जोशी, पूजा वानखेडे आदी उपास्तिथ होते. या कार्यक्रमाच्या यशस्वतेसाठी एकनाथ पवार, प्रफुल्ल कांबळे, अनिकेत सूर्यवंशी, संतोष कोटकर, मनीषा गजभार, सुनील देशपांडे यांनी प्रयत्न केले. या शिबिरासाठी कंपनीतील गिरीधर गायकवाड, भागीनाथ गोरे, अमर बोराटे, महेंद्र चौधरी, श्रीकृष्ण मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे सुरेश मेहेरकर यांच्यासह कंपनीतील कर्मचारी, कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *