March 23, 2026

वाळूजमहानगर, (ता.17)) :- वडगाव (को.) येथील गट नंबर 5 मधील रस्त्याची अत्यंत झालेली दुरावस्था व अंधाराच्या साम्राज्यामुळे अनुचित प्रकार वाढत आहे. यावर उपाय म्हणून रस्ता दुरुस्त करून पथदिवे बसवावे. या मागणीसाठी शिवसेना महिला आघाडी विभाग संघटिका छाया जाधव यांच्या नेतृत्वाखाली सिडको प्रशासनाला गुरुवारी (ता.16) रोजी निवेदन देण्यात आले.

https://youtube.com/@RKBharad1967

सिडको प्रशासनाच्या दीपा मोघळ मुंडे यांना दिलेल्या या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, वडगांव कोल्हाटी गट क्रमांक 5 येथुन चौफुली रस्ता दुरुस्त करून देणे व पथदिवे बंद असल्याने महिलांना छेडखानी होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्याकरिता परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावा, बंद असलेली स्ट्रीट लाईट सुरू करण्यात यावे. महिलांच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची असलेली ही कामे लवकर न करुन दिल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल. असा इशाराही या निवेदनात देण्यात आला आहे. या निवेदनावर छाया जाधव, नामदेव सांगळे, ज्योत्स्ना सोनवणे, लता देवरे, काशीबाई जाधव, भारती महाजन, वर्षा चंदन, उमेश गिरी, नामदेव मुसळे, बेबी सोनलने आदींची नावे व स्वाक्षऱ्या आहेत.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *