March 23, 2026

वाळूजमहानगर (ता. 9) :- वाळूज येथील बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचे शहरप्रमुख सचिनभाऊ काकडे यांच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे गुरुवारी (ता.9) रोजी आयोजन करून वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. शहर प्रमुखाच्या या अनोख्या उपक्रमात वाळूजसह परिसरातील 58 रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले.

तालुकाप्रमुख दिलीप निरपळ यांच्या हस्ते या रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपतालुकाप्रमुख नंदकुमार राऊत, वाळूज शहरप्रमुख तथा ग्रामपंचायत सदस्य सचिनभाऊ काकडे, ग्रामपंचायत सदस्य अमजदखान पठाण, राहुल भालेराव, सचिन मुंडे, शुभम हुले, सतीश गायकवाड, सूर्यभान भोकरे, अविनाश गायकवाड, अमोल ठोकळ, सचिन पानखडे, दत्ता घोरपडे, गोवर्धन राजपूत, बाबासाहेब शिंदे, अनिल जमदाडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

वाळुज येथील कामगार कल्याण केंद्रात गुरुवारी (ता.9) रोजी आयोजित करण्यात आलेल्या या रक्तदान शिबिरात वाळूजसह परिसरातील 58 रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. या रक्तदान शिबिरात घाटी रक्तपेढीच्या डॉ. रचना पवार, डॉ. शीला बोथीकर, अनुसया घोगरे, शुभम धुळे, प्रथमेश वाघमारे, साक्षी लामदाढे, तुषार डोंगरे आदींनी रक्त संकलन केले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *