वाळूज महानगर (ता.7) :- बँक ऑफ महाराष्ट्र शाखा तुर्काबादच्या वतीने बँकेचे अधिकारी एन.पवार व बद्रिनाथ घोगरे पाटील यांनी येसगाव (दिघी) ता.गंगापूर येथे शनिवारी (ता.5) रोजी छोटे खाने कार्यक्रमाचे आयोजन करून बँकेच्या योजना ग्रामस्थांना समजावून सांगितल्या.
आर्थिक समावेशनाद्वारे सक्षमीकरण या केंद्र शासन पुरस्कृत पथदर्शी मोहीमअंतर्गत येसगाव येथे शनिवारी (ता.5) रोजी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात बँकेच्या विविध योजनांची माहिती शेतकऱ्यांना देण्यात येऊन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले.
याप्रसंगी अनेक शेतकऱ्यांचे शुन्य (0) बॅलन्स वर मोफत बँक खाते उघडण्यात आले. यावेळी येसगावचे मा.सरपंच भराड पाटील येसगावकर व हरिचंद पेहरकर तसेच ग्रामसेवक लोढे व संजय जगताप आणि आप्पासाहेब काठोते, शकील पटेल, भानुदास गाडेकर, अजिनाथ चौधरी, यासिन पटेल, हरिचंद जगताप यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.