February 5, 2026

वाळूजमहानगर, (ता.31) – येसगाव येथे दिवटे वस्तीवर अज्ञात चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवत पैसे व सोन्या चांदीची मागणी केली. मात्र त्यास नकार देताच अज्ञात दरोडेखोरांनी 65 वर्षीय वृद्ध महिलेवर चाकूने वार करून गंभीर जखमी केले. शनिवारी (ता.31) रोजी पहाटे झालेल्या या थरारक घटनेतील जखमीस उपचारार्थ घाटीत दाखल करण्यात आले आहे.

येसगाव येथील राजुरा रस्त्यावर दिवटे वस्ती आहे. या वस्तीवर दहा ते बारा घरे अंतरा अंतरावर आहेत. यातीलच साहेबराव दिवटे यांच्या वस्तीवर अज्ञात चोरट्यांनी शेत वस्तीवरील घराची पाठीमागील भिंत फोडून आज प्रवेश केला. त्यानंतर आत मध्ये पलंगावर झोपलेल्या चंद्रकलाबाई साहेबराव दिवटे यांना चाकूचा धाक दाखवला. पैसे व सोन्या चांदीचे दागिने काढून देण्याची मागणी केली. मात्र मला मारू नका अशी गयावया करूनही चोरट्यांनी चंद्रकलाबाईवर चाकूने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. डोक्यावर, मानेवर, डोळ्याजवळ असे वेगळे चार ते पाच वार झाल्याने चंद्रकलाबाई गंभीर जखमी झाल्या. त्यानंतर चंद्रकलाबाईच्या गळ्यातील सोन्याची पोत व कानातील कर्णफुले ओरबाडून फळ काढला.असे सांगितल्या जाते. पहाटे 2:45 वाजेच्या सुमारास झालेल्या या घटनेत गंभीर जखमी झालेल्या चंद्रकलाबाईला उपचारार्थ घाटीत दाखल करण्यात आले आहे.

 

दरम्यान वाळुज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. तसेच फॉरेंसिक लॅब व स्वान पथकाच्या मदतीने माग काढण्याचा प्रयत्न केला. या थरारक घटनेमुळे शेत वस्तीवर राहणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान पोलीस उपायुक्त दीपक गिर्हे, पोलीस निरीक्षक सचिन इंगोले यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *