March 23, 2026


वाळुज महानगर, (ता.12) – मासिक सभेसाठी आलेल्या व मागासवर्गीय असलेल्या महिला सरपंचाचे दोन्ही हात पकडून व केस ओढून मारहाण केली. तसेच जातीवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. द्वेष भावना व इर्षेमुळे झालेला हा प्रकार गंगापूर तालुक्यातील येसगाव (डिघी) येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर बुधवारी (ता.12) रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास घडला.

याबाबत वाळूज पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीचा आशय असा, येसगाव सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुक 2021 मध्ये अनुसुचित जातीच्या जागेवर ग्रामपंचायत सदस्य म्हणुन शोभा अशोक जाधव या निवडुन आल्या. येसगावचे सरपंच पद हे अनुसुचित जातीच्या मागासवर्गीय महिलेसाठी राखीव होते. शिवाय अनुसुचित जातीची एकमेव मागासवर्गीय महिला सदस्य असल्याने शोभा जाधव या बिनविरोध सरपंच झाल्या. त्या सरपंच झाल्यापासुन सतिश पांडुरंग पेहरकर व हरिचंद्र भाऊसाहेब पेहरकर रा. येसगाव यांनी मागासवर्गीय सरपंच झाल्याने सतत जाधव यांच्याशी जातीयवाद करत तिरस्कार केला. व कोणत्याही कामात सहकार्य न करता त्यांच्या विरुध्द विविध शासकिय कार्यालयात तक्रारी करुन त्रास दिला. येसगाव येथील 24 फेब्रुवारी रोजीची ग्रामपंचायत मासिक सभा तहकुब झाली होती. ती मासिक सभा बुधवारी (ता.12) रोजी सकाळी 9:30 वाजता ग्रामपंचायत कार्यालयात ठेवण्यात आली होती. सरपंच शोभा जाधव या ग्रामपंचायत कार्यालयात मासिक सभेसाठी जात असतांनाच ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर हरिचंद्र पहेरकर व सतीश पेहरकर यांनी त्यांना थांबवुन दोघांनीही जातीवाचक शिवीगाळ करत अंगावर धावले. आणि दोन्ही हात व केस धरून ओढुले. तसेच तु मासिक सभेला का? आली. आम्ही तुला जिवंत सोडणार नाही. अशी धमकी देत जातीवाचक शिवीगाळ केली. आम्ही सरपंच केले तरीही आमचे ऐकत नाही, आमच्या विरोधात कोठे जायचे ते जा, आम्ही तुझा व तुझ्या नवऱ्याचा माज जिरवतो. तु कशी सरपंच पदावर राहतेस समजेल तुला. असे म्हणत झटापट केली. यावेळी सरपंच शोभाबाईचे पती अशोक जाधव आणि गावातील गोरख साहेबराव दिवटे, शेख मन्नन शेख महमद, कडु त्रिंबक जगताप व आशाबाई कडु जगताप यांनी सरपंच शोभा जाधव यांना त्या दोघांच्या तावडीतून सोडवले.

फिर्यादीत असेही म्हटले आहे की, हरिचंद्र भाऊसाहेब पेहरकर व सतीश पांडुरंग पेहरकर रा. येसगाव ता. गंगापूर जि. छत्रपती संभाजीनगर हे दोघेही आडदांड आणि विकृत असुन त्यांच्यापासुन माझ्या व माझ्या पतीच्या जीवास धोका आहे. दोघेही कायमच माझ्यावर आणि माझ्या पतीवर पाळत ठेवुन असतात. मी अनुसुचित जातीची असुन सरपंच झाल्यामुळे माझ्या विषयी असलेल्या द्वेषामुळे व इर्षेमुळे मला त्रास देण्यात येत आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *