
वाळुज महानगर (ता.3) – युवासेनेच्या उपजिल्हाप्रमुखपदी वाळूज येथील संतोष आरगडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी आरगडे यांना नियुक्तीपत्र देऊन स्वागत केले.
मुख्यंमञी एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार व पालकमंञी संदीपान भुमरे यांच्या सुचनेनुसार तसेच जिल्हाप्रमुख राजेद्र जंजाळ, उपजिल्हाप्रमुख दिलीपसिंग राजपुत, तालुकाप्रमुख दिलीप निरफळ, विलासबापु भुमरे यांच्या मार्गदर्शनखाली युवासेना जिल्हाप्रमुख भरत कदम यांनी सतोष आरगडे यांची युवासेनेच्या उपजिल्हाप्रमुखपदी निवड केली. यावेळी गंगापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सचिन काकडे, उपतालुकाप्रमुख नंदु राऊत, राहुल भालेराव, शुभम हुले, मुन्ना गवळी, शिवनाथ भुंजग, अंनत खवले, शैलेष गायकवाड, नवनाथ निरफळ, सतोष आरगडे आदी उपस्थित होते.
