वाळूजमहानगर, ता.26 – जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर आणि क्रीडा व युवक संचालनालय, पुणे यांच्या अंतर्गत पुण्यात 12 ते 14 जानेवारीदरम्यान आयोजित 19 वर्षाखालील मुले व मुली राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर (बजाजनगर)च्या युरेका इन्फोसिस स्कूलने अप्रतिम कामगिरी करत चौथ्या स्थानावर आपली जागा निश्चित केली.
विशेष म्हणजे छत्रपती संभाजीनगर (बजाजनगर) च्या संघातील श्रावणी गणेश गायकवाड हिने या स्पर्धेत आपल्या उत्कृष्ट खेळाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आणि राष्ट्रीय स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे. ही निवड संपूर्ण जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब ठरली आहे. याबद्दल शाळेचे संस्थाचालक, मुख्याध्यापक आणि हॉकी प्रशिक्षक यांनी श्रावणीचे स्वागत केले आणि राष्ट्रीय स्पर्धेत यश संपादन करण्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्यांच्या प्रोत्साहनामुळे श्रावणीसह संपूर्ण संघाला पुढील वाटचालीसाठी प्रेरणा मिळाली आहे. श्रावणीची ही यशस्वी वाटचाल तिला राष्ट्रीय पातळीवर चमक दाखवण्यासाठी एक संधी ठरणार आहे. तिच्या या यशाने शाळेचा आणि शहराचा नावलौकिक वाढवला आहे.