
वाळुज महानगर, (ता.2) – समाज प्रबोधन बहुउद्देशिय सामाजिक संस्था संचलित यशवंत पब्लिक स्कूल इंद्रप्रस्थ कॉलनी बजाजनगर येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
प्रथम वडगाव (को.) – बजाजनगरच्या माजी सरपंच छाया बाळासाहेब कार्ले यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे तालुका समन्वयक बाळासाहेब कार्ले यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला. कार्यक्रमास चंद्रकांत जाधव, कुमार माळवे, सुरेखा माळवे, सीमा गोटे, दामिनी राणे, शारदा तायडे, भाग्यश्री दाभाडे, गीता टाके आणि यशवंत पब्लिक स्कूलचे शिक्षक आणि विद्यार्थी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
