
वाळुज महानगर, ता.19) – वाळुज महानगरात बजाजनगरातील श्री मोहटादेवी मंदिरात 19 व्या वर्षी नवरात्र निमित्त भव्य अखंड हरिनाम सप्ताह व श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा 22 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर पर्यंत आयोजित करण्यात आला आहे.
नवरात्रात येथे दररोज सकाळी व सायंकाळी देवीची पूजा व महाआरती करण्यात येणार असून सप्ताहात दररोज पहाटे 4 ते 6 काकडा भजन, सकाळी 6 ते 7 श्री विष्णुसहस्त्र नाम, 7 ते 11 श्री ग्रंथ राज ज्ञानेश्वरी पारायण, 11 ते 1 जगद्गुरु संत तुकाराम गाथा भजन, दुपारी 3 ते 5 वसंत केंद्रे हे श्रीरामकथेचे वाचन करणार आहेत. सायंकाळी 6 ते 7 हरिपाठ, रात्री 8 ते 10 आळंदी (पुणे) येथील ह भ प गीता भांगे – खाडे या ज्ञानेश्वरीचे निरूपण करणार आहेत. 1 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक व भगवान गडाचे महंत न्यायाचार्य नामदेव शास्त्री सानप यांचे गोपाल काल्याचे कीर्तन होणार असून महाप्रसादाने सप्ताहाची सांगता करण्यात येणार आहे. या धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन श्री मोहटादेवी मंदिर ट्रस्ट बजाजनगरच्या वतीने करण्यात आले आहे.
