वाळूजमहानगर, ता.24 – हॉटेलमध्ये जेवण करताना शेजारच्या टेबलावरील तिघांनी एका 23 वर्षीय तरुणाच्या डोक्यात बिअरची बाटली मारून त्याचा दहा हजार रुपये किमतीचा मोबाईल हिसकावाणाऱ्या तीघांना बुधवारी (ता.22) रोजी रात्री पोलीसांनी अटक केली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती आशी की, चेतन गिरासे रा.साईश्रध्दा पार्क, मोहटादेवी मंदिर बजाजनगर हा बुधवारी (ता. 22) रात्री 11.30 वाजेच्या सुमारास बजाजनगरातील माणीक हॉटेल येथे जेवन करण्यासाठी गेला होता. त्यावेळी त्याच्या टेबलच्या बाजूला बसलेला अनोळखी तिघांनी चेतनला मारहाण केली. त्यातील एकाने बीयरची बॉटल चेतनच्या डोक्यात मारुन त्याच्या जवळील 10 हजार रुपये किमतीचा मोबाईल हिसकावून तेथून पळून गेले.
या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दालख करून सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्यातील चित्री करण्यावरून आरोपीचा शोध घेऊ गणेश दिनकर गणने, मुकेश रावसाहेब गोरे, अविनाश शाम कुलाल या तीघांना रांजणगाव येथून अटक केली. ही कारवाई वरिष्ठ निरिक्षक रामेश्वर गाडे, सपोनि मनोज शिंदे, दिनेश बन, पोह बाळासाहेब आंधळे, पोलीस हवालदार राजाभाऊ कोल्हे, मनमोहनमुरली कोलमी, समाधान पाटील, हनुमान ठोके, गणेश सागरे, यशवंत गोबाडे यांनी केली.