February 5, 2026

वाळूजमहानगर, (ता.12) – शाळा सुटल्यानंतर कमळापूर येथील एक शिक्षिका मैत्रिणी सोबत रस्त्याने पायी जात होती. त्याचवेळी दुचाकीवर ट्रिपलशिट आलेल्या तिघांपैकी एकाने शिक्षिकेच्या हातातील मोबाईल हिस्काऊन फरार झाले. सोमवारी (ता.9) रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास झालेल्या या लुटीतील आरोपींच्या वाळूज एमआयडीसी पोलिसांनी अवघ्या काही तासाच्या आत पकडून त्यांच्या मुस्क्या आवळल्या. ही कारवाई वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या पथकाने अत्यंत शितापिने केली.


कमळापूर येथील कोमल भास्कर निकाळजे (21) ही गुरुकुल इंग्लिश मिडीयम स्कुल जोगेश्वरी येथे शिक्षिका आहे. ती सोमवारी (ता.9) रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास शाळा सुटल्यानंतर पूजा मनोज सरोदे व तिचा भाऊ लखन यांच्यासह पायी येत होती. ती कमळापूर येथील लोहकरे यांच्या बंगल्यासमोरून जात असताना कोमल निकाळजे हिच्या हातातील मोबाईल दुचाकीवर ट्रिपल सीट आलेल्या पैकी एकाने हिसकावून पोबारा केला. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येऊन वरीष्ठ पोलीस निरीक्षक संदीप गुरमे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी आरोपीतांचा गोपणिय माहितीच्या आधारे शोध घेत प्रथम विधी संघर्ष बालकास ताब्यात घेवुन विचापुस केली असता त्याच्या सोबत गुन्हा करण्यासाठी सहभागी असलेले त्याचे साथिदार आरोपी कानिफनाथ उर्फ सौरभ संतोष लोहकरे, वय 19 वर्षे, रा. जामा मस्जिदजवळ रांजणगाव (शेपु,) व फैजल सलीम कुरेशी, वय 20 वर्षे, रा. साईनगर, रांजणगाव (शेपु,) यांना ताब्यात घेण्यात आले असुन पुढील तपास चालू आहे. ही कामगीरी पोलीस आयुक्त निखील गुप्ता, पोलीस उप आयुक्त दिपक गिऱ्हे, सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप गुरमे तसेच तपास पथकाचे ईन्चार्ज पोलीस उप निरीक्षक चेतन वगले, पोलिस अंमलदार सुरेश कचे यांनी केली आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *