वाळूज महानगर, (ता.7) – मोबाईल शॉपीची भिंत फोडून चोरी करणार्या परप्रांतीय टोळीचा वाळुज एमआयडीसी पोलिसांनी पर्दाफाश करून दोन आरोपीतांना जेरबंद केले. त्यांच्या ताब्यातील विविध कंपन्यांचे मोबाईल व इतर एसेसरीज असा 8 लाख 60 हजार 257 रुपये किंमतीचा ऐवज हस्तगत करण्यात आला. मात्र यातील दोन आरोपी अद्यापही फरारच असून त्यांचा शोध सुरू आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी 17 सप्टेंबर सकाळी 9.40 ते 18 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 10.10 वाजे दरम्यान सेलेक्ट गॅझेट एल.एल.पी. या दुकानाची दक्षिण बाजुच्या भिंतीला व्होल पाडून, प्लायवुड व पिओपी फोडुन दुकानात प्रवेश करुन आतील 21 लाख 26 हजार 494 रुपये कंपनीचे विविध मोबाईल व इतर अँसेसरीज चोरुन नेला. या प्रकरणी
सुलतान मतीन देशमुख (31) रा. हिनानगर, चिकलठाणा ता. जि. छत्रपती संभाजीनगर यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध कलम 380, 461 भादंविप्रमाणे 18 सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल आहे.
मुंबई व उत्तर प्रदेश येथून आणले आरोपी –
या गुन्ह्याच्या तपासासाठी 23 सप्टेंबर 2023 रोजी
वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या एका पथकाने मुंबई येथे जाऊन आरोपी मोहंमद इम्तियाज मोहंमद शकील (28) रा. बैगनवाडी, गोवंडी मुंबई यास शिताफीने ताब्यात घेऊन त्याच्याकडुन गुन्ह्यात चोरीस गेलेले मोबाईल व ब्लुटुथ किंमत अंदाजे 50 हजार 996 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. अटकेदरम्यान त्याच्याकडुन माहिती मिळाल्याने आरोपी कामील नियानत खान (27) रा. सकराबात ता. छिनामुम जिल्हा कन्नोज (उत्तरप्रदेश). हल्ली मुक्काम एकतानगर, रांजणगाव (शेणपुंजी) वाळूज याचा शोध घेऊन त्याच्याकडुन व आरोपी मोहंमद इम्तीयाज मोहंमद शकील याच्याकडुन गुन्ह्यातील 8 लाख 60 हजार 257 रुपये किंमतीचे विविध कंपनीचे अँन्डरॉईड मोबाईल हस्तगत करण्यात आले.
चोरी करण्यासाठी घेतले बोलावून –
आरोपी कामील नियानत खान रा. सकराबाद ता. चित्राम जिल्हा कन्नोज (उत्तरप्रदेश), हल्ली मुक्काम एकतानगर, रांजणगाव (शेणपुंजी) एमआयडीसी वाळूज हा मास्टरमाइंड असून त्याने हा गुन्हा करण्यासाठी आरोपी मोहंमद इम्तीयाज मोहंमद शकील रा. मुंबई व त्याचा सख्खा भाचा आणि त्याचा मित्र यांना एमआयडीसी वाळुज येथे बोलावुन घेतले होते.
दोन जेरबंद मात्र दोन फरारच –
ही चोरी चौघांनी मिळून केली, त्यापूर्वी आरोपींनी दुकानाची रेकी केली. आणि रात्रीअपरात्री दुकानाच्या भिंतीला लागुन असलेल्या झाडेझुडपांच्या आडून तिक्ष्ण हत्याराने दुकानाच्या भितीला होल पाडुन आत प्रवेश करुन मोबाईल व ईतर ॲक्सेसरीज असा ऐवज चोरून नेला. आरोपी पैकी कामील नियानत खान व मोहंमद इम्तियाज मोहंमद शकील या दोघांना जेरबंद करण्यात आले. मात्र आणखी इतर दोन आरोपी फरारच असून ते परप्रांतीय आहेत. त्यांचा शोध चालु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
यांनी केला परप्रांतीय टोळीचा पर्दाफाश –
पोलीस आयुक्त मनोज लोहिया, पोलीस उपआयुक्त नितीन बगाटे, सहाय्यक पोलीस अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अविनाश आघाव, पोलीस निरीक्षक गणेश ताठे, सपोनि गौतम वावळे, पोउपनि. दिपक रोठे पोना. धिरज काबलिये, पो. अं. सुरेश कचे, अविनाश ढगे, यशवंत गोबाडे, सुरज अग्रवाल, सुरेश भिसे, राजाभाऊ कोल्हे, सतवंत सोहळे, नितीन इनामे, हनुमान ठोके यांनी ही कामगीरी
करून मोबाईल शॉपी फोडणाऱ्या परप्रांतीय टोळीचा पर्दाफाश केला.