वाळूजमहानगर – मतदार नाव नोंदणीसह आधार कार्ड मतदान कार्डाशी लिंक करणे. त्याचबरोबर सरकारी कामकाजासाठी लागणारे कागदपत्रे काढण्यासाठी वाळूज येथे तीन दिवशी मोफत शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचा सर्वांनी लाभ घ्यावा. असे आवाहन करण्यात आले आहे.
मतदान करण्यासाठी आधारकार्ड लिंक करणे आवश्यक आहे. त्यामुळे मतदानापासून कोणीही वंचित राहू नये. म्हणून सर्व मतदारांनी आपले आधार कार्ड मतदान कार्डशी लिंक करून घ्यावे, येताना सोबत आधारकार्ड व मतदान कार्ड आणावे. याशिवाय मोफत मतदान नोंदणी, हरवलेले मतदान कार्ड पुन्हा काढणे, आधारला मोबाईल नंबर लिंक करणे. अशा प्रकारचे अनेक सरकारी कागदपत्र काढण्यासाठी वाळूज येथे मोफत शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी (ता.30) पासून सुरू झालेले हे मोफत शिबिर रविवारी (ता.2) ऑक्टोबर पर्यंत सुरू राहणार आहे. सरपंच सहीदाबी पठाण यांच्या निवास स्थाना समोर ,कमळापूर रोड, वाळूज येथे सकाळी साडेदहा ते सायंकाळी साडेपाच पर्यंत हे सुरू राहणार आहे. याचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा. असे आवाहन भैया पठाण यांनी केले आहे.