
वाळुज महानगर ता 13)- भरधाव जाणारी मोटरसायकल स्लीप होऊन झालेल्या अपघातात मोटरसायकलवरील एक महिला गंभीर जखमी झाली. हा अपघात शनिवारी (ता.13) रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास लिंबेजळगावजवळ झाला.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, मीरादास गायकवाड आणि कल्पनाबाई मिरादास गायकवाड हे श्रीरामपूरवरून छत्रपती संभाजीनगर येथील शिवाजीनगरला मोटारसायकल (एम एच 20, सी डी -3873) ने शनिवारी (ता.13) रोजी जात होते. छत्रपती संभाजीनगर ते पुणे हायवेवर लिंबेजळगाव ॲम्बुलन्स पॉईंट समोर यांची मोटरसायकल सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास स्लिप होऊन अपघात झाला. या अपघातामध्ये कल्पनाबाई यांना गंभीर जखम झाली. अपघाताची माहिती मिळताच जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानची 24 तास सेवेत असणाऱ्या विनामूल्य ॲम्बुलन्सचे पायलट संदीप त्रिंबके त्यांनी तात्काळ अपघातस्थळी धाव घेऊन अपघातग्रस्तांना वाळूज हॉस्पिटल येथे दाखल केले.
