March 23, 2026

वाळूजमहानगर, (ता.10) – वाळूज औद्योगिक वसाहतीतील बजाजनगरसह परिसरात मोकाट कुत्रे व जनावरांचा उपद्रव्य वाढत आहे. परिणामी अपघातासह लहान मुले जखमी होत आहे. अशाच मोकाट जनावरांच्या एका समूहामुळे सात वर्षीय चिमुकली गुरुवारी (ता.10) रोजी जखमी झाली. नेहमी घडणाऱ्या या घटना त्यामुळे मोकाट कुत्रे व जनावरांचा तात्काळ बंदोबस्त करावा. अशी मागणी पालकांमधून होत आहे.

छत्रपती संभाजी नगर शहरातील मोकाट कुत्रे पकडून ते वाळुज औद्योगिक वसाहत व वाळूज परिसरात आणून सोडल्या जाते. वाळूज परिसर हा सिडको व एमआयडीसी यांच्या अख्त्यारित येतो. या मोकाट कुत्र्यांच्या झुंडी दिवस-रात्र परिसरातील विविध नागरी वसाहतीत फिरत असतात. येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांचा पाठलाग करणे, महिला व लहान मुलांच्या अंगावर धावणे, आपापसात झुंज करणे. असे प्रकार नित्यनेमाचेच झाले आहे. दोन दिवसापूर्वी सिडको वाळूज महानगर येथील सारा गौरव व सारा वृदावन येथे सहा वर्षीय चिमुकली धनश्री निलेश भारती ही घरासमोर खेळत होती. त्याचवेळी कुत्र्याची झुंज तिच्या अंगावर आली आणि ती खाली पडून गंभीर जखमी झाली.

या प्रकारानंतर गल्लीतील नागरिकांनी मुलीला कुत्र्याचा तावडीतून सोडवत उपचारार्थ दवाखान्यात दाखल केले. या प्रकारामुळे येथील नागरिकांमध्ये मोकाट कुत्रे व जनावरे यांची दहशत निर्माण झाली आहे. मात्र यावर एमआयडीसी व सिडकोकडून कोणतीही कारवाई केली जात नाही. त्यामुळे नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *