वाळूजमहानगर (ता.15) : – वाळुज औद्योगिक वसाहतीतील मे बाळकृष्ण इंडस्ट्रीज या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अरविंद पोधार यांच्या 65 व्या वाढदिवसाचे औचित्य साधुन शुक्रवारी (ता.11) नाव्हेंबर रोजी रक्तदान शिबीर आयोजित केले होते. या शिबीरात 200 हुन अधिक कामगार व कर्मचाऱ्यांनी उत्सफुर्तपणे रक्तदान केले.
सध्याच्या धावपळीच्या जगात रोड अपघात, मलेरीया, हिमोफिलीया, थायलेसीमिया, डेंगु अशा अनेक आजारांमुळे रक्तपेढीमध्ये रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे रुग्ण व रुग्णांचे नातेवाईक यांना रक्तासाठी खुप अडचणी येतात. त्यामुळे वाळुज औद्योगिक वसाहतीतील मे. बाळकृष्ण इंडस्ट्रीज लि. ही कंपनी नेहमीच सामाजिक बांधीलकी जपत असते. कंपनीतील कामगार, कर्मचारी तसेच मे. बाळकृष्ण टायर्स संघटना हे सातत्याने मागील 15 वर्षापासुन कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अरविंद पोधार यांचा वाढदिवस रक्तदान करून साजरा करतात.
त्याचाच एक भाग म्हणून शुक्रवारी (ता.11) रोजी रक्तदान शिबीर घेण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्घाटन कंपनीचे युनीट हेड वरुण कुमार झा यांनी रिबीन कापुन केले. यावेळी कंपनीचे के. वेंकटरमण, अजय गुप्ता, व्ही. एम. पाठक, बी. एस. पाठक, महेश कुलकर्णी, पियुष सोनी, सुधाकर पांचाळ, आर. के. कुलकर्णी, मुकेश गुप्ता तसेच बाळकृष्ण टायर्स कामगार संघटनेचे अध्यक्ष के. सी. जाधव, उपाध्यक्ष नन्दु शिंदे, सचिव जी. जे. जाधव यांच्यासह बी. ए. जाधव, महादेव साखरे, आर. जी. काळे, महादेव मोगल, सुनिल मेरड, ज्ञानेश्वर मोहिते व इतर कामगार आणि कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आबासाहेब वाघमारे, चंद्रकांत भालेराव, खालेद खान, बी. बी. निकम, सचिन बेलोकर, व्हि. एम. कस्तुरे व इतर कामगार तसेच कर्मचारी यांनी विशेष परिश्रम केले. घाटी हॉस्पीटलच्या सहकार्याने घेण्यात आलेल्या या शिबिरात डॉ. तेजस्विनी जाधव, डॉ. प्रज्ञा गायकवाड, सुनिता बनकर, हनुमान रूळे यांनी रक्त संकलन केले.