February 5, 2026


वाळूजमहानगर, (ता.27) – वाळूज औद्योगिक वसाहतीतील मेटलमॅन ऑटो कंपनीच्या वतीने मेटलमॅन मेटल मॅन ऑटोचे व्यवस्थापकीय संचालक नवनीत जयरथ यांच्या 74 व्या वाढदवसानिमित्त घेण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धेत आर एन डी स्ट्रायकर्स संघाला धूळ चारत मेटल मॅन वॉरियर्सने प्रथम पारितोषिक पटकावले.

वाळूज परिसरातील करोडी येथे रविवारी (ता.22) रोजी झालेल्या या क्रिकेट स्पर्धेत एकूण 14 संघाने सहभाग घेतला. अंतिम सामना मेटल मॅन वॉरियर्स विरुद्ध आर एन डी स्ट्रायकर्स यांच्यामध्ये रंगला. यामध्ये मेटल मॅन वॉरियर संघ प्रथम विजेता ठरल्याने प्रथम पारितोषिक पटकावले. विजेत्या संघास मेटल मॅन ऑटोचे सीओओ श्रीकांत मुंदडा यांच्या हस्ते 11 हजार रुपये रोख व चषक देण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मेटलमॅन ऑटोचे सीओओ श्रीकांत मुंदडा यांच्यासह करोडी येथील सरपंच सुनिता देविदास गवांदे, प्लांट हेड अनिलकुमार डहाळे, कृष्णकांत बिजमवार, प्रकाश एखंडे, भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस प्रभाकर मतेपाटील, शिवाजी तुरटवाड, किशोर जगताप, कल्याण पिनप्रतीवर यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गोरख गोटेकर, दिनेश करमाळकर, गुरुदास पराते, श्रावण ढोले, दत्तात्रय धनक, रवी पेठशिवणीकर, दीपक भोसले, विकास शिंदे, जगदीश जाधव यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मकरंद निखाडे यांनी केले. तर अतुल भास्कर यांनी आभार मानले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *