वाळूजमहानगर, (ता.10) – वाळूज औद्योगिक वसाहतीतील मेटल मॅन ऑटो व मेटल मॅन ऑटो क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिरामध्ये 325 कामगार व कर्मचारी यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले.
मेटल मॅन ऑटोचे सी.ओ.ओ. श्रीकांत मुंदडा यांच्या हस्ते या रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. या रक्तदान शिबिरात मेटलमॅन ऑटो कंपनीतील अधिकारी, कर्मचारी व कामगार मिळून 325 जणांनी उस्फूर्तपणे सहभाग घेत रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.
दत्ताजी भाले रक्तपेढीच्या सहकार्याने घेण्यात आलेल्या या रक्तदान शिबिरात भाग घेणाऱ्या सर्व रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. या शिबिरात दत्ताजी भाले रक्तपेढीचे कृष्णा कुलकर्णी व त्यांच्या टीमने रक्त संकलन केले.
यावेळी कृष्णा कुलकर्णी यांनी शहरात उष्णतेमुळे गरजू रुग्णांना या रक्तदानाचा अत्यंत फायदा होईल. सामाजिक बांधिलकी जपण्यास मेटल मॅन ऑटो सदैव अग्रशील असते. त्यामुळेच रुग्णांना वेळेवर लागणारे रक्त उपलब्ध होते.
शिबिराच्या यशस्वीतेसाठी गुरुदास पराते, नारायण निकम, राजेश मानकर, रवी पेठशिवणीकर, प्रकाश साळुंखे, रुपेश लोंढे, काकासाहेब केरे, विष्णू जोशी, संतोष तिवाडे, महेंद्र तेली, सुधाकर तांबे, योगेश भुतेकर, अशोक गुट्टे.रवींद्र कुलकर्णी, राजेश पवार. अतुल भास्कर, यांनी सहकार्य केले. प्रकाश एखंडे यांनी आभार मानले.